ShubhMangal Sakal Jain Vadhu-Var Palak Parichay Melava
Let's Make your unforgettable day
Shubhmangal Sakal Jain Vadhu-Var Palak Parichay Melava is a dedicated jain matrimony platform where we will help you find you a perfect marriage match.
Shubhmangal Sakal Jain Vadhu-Var Palak Parichay Melava
Shubhmangal Sakal Jain Vadhu-Var Palak Parichay Melava will be conducted every four months in different cities in Maharashtra
Coming On June 2024 in Solapur
STEP BY STEP GUIDE
1. Open Google Link
2. fill up details
3. Online Payment
4. send screenshot
5. seat booking & confirm
6. ready to melava
7. after few day vadhu-var melava book is home delivery
शुभमंगल सकल जैन समाज वधू-वर पालक परिचय मेळावा 2023 उत्साहात संपन्न.
💑💑💑💑💑
आर्यनंदी परिवार संचलित व आर्यनंदी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन आयोजित, शुभमंगल सकल जैन समाज वधू-वर पालक परिचय मेळावा 2023, रविवार दिनांक 10 /12 /2023 रोजी जैनगिरी, जटवाडा, छ. संभाजीनगर येथे अतिशय भव्य- दिव्य पद्धतीने पार पडला.
सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रो. ह. यो. चे माननीय मंत्री ना. संदिपानजी भुमरे यांचे स्वीय सहाय्यक, श्री राहुलजी पालंबे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून छ. संभाजीनगर येथील आयकर अधिकारी श्री समुद्रविजय हिरप, के.सि.पी. ग्रुपचे उद्योजक श्री रविंद्रजी कोंडेकर, श्री निलेश सावळकर (उद्योजक), श्री प्रमोदजी डेरे (उद्योजक), श्री सुकुमार समजगे, श्री बाहुबली बोपलकर, श्री महावीर जैन (जोगी) आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प. पू. 108 आचार्य आर्यनंदी महाराजांच्या प्रतिमेसमोर पुष्पांजली अर्पण करून, दिप प्रज्वलन करण्यात आले.
आर्यनंदी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हणाले की, राज्यातील विविध भागातून आलेले उमेदवार व त्यांचे पालक या कार्यक्रमास उपस्थित राहून, एकाच छत्राखाली अनेक वधू वर उमेदवार स्थळांची माहिती, माफक दरामध्ये उपलब्ध करून देणे, जेणेकरून सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत व्हावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे सांगितले, तसेच आर्यनंदी परिवारातर्फे चालविण्यात येणाऱ्या आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था, आर्यनंदी निधी कंपनी, आर्यनंदी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन, आर्यनंदी सांस्कृतिक प्रतिष्ठान व आर्यनंदी मासिक या वेगवेगळ्या कार्यरत शाखांची माहिती दिली.
तदनंतर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच मेळाव्यास लाभलेले विविध प्रायोजक यांचा मान्यवरांच्या हस्ते आर्यनंदी स्मृती चिन्ह, आचार्य आर्यनंदी जीवनगाथा पुस्तिका, आर्यनंदी महाराज प्रतिमा व पंचरंगी दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर शुभमंगल सकल जैन समाज वधु वर पालक परिचय पुस्तिका 2023 तसेच नूतन वर्ष 2024 च्या आर्यनंदी दिनदर्शिकाचे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते अनावरण करण्यात आले.
सदर मेळाव्यास उपस्थित मान्यवरांपैकी श्री फुलचंदजी जैन, श्री बाहुबली बोपलकर, श्री समुद्रविजय हिरप, श्री रविंद्रजी कोंडेकर यांची समायोचित भाषणे झाली.
अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना श्री राहुलजी पालंबे यांनी सांगितले की, आपला जैन समाज हा अल्पसंख्यांक असून, तो ही विखुरलेला आहे. तेव्हा असे वधु वर पालक मेळावे हे खूप मोलाची भूमिका बजावतात. अशा पद्धतीने वधू वर मेळावे होणे ही काळाची गरज आहे. नेमकी हीच काळाची गरज ओळखून, आर्यनंदी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले सर यांनी हे खूप मोठे विधायक कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या या समाज प्रधान कार्यास हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या आर्यनंदी परिवाराची अशीच भरभराट होवो, ही आर्यनंदी महाराज चरणी प्रार्थना.
कार्यक्रमाचे सूत्र-संचालन संस्थेचे संचालक श्री निलेश एखंडे, सल्लागार सदस्य श्री विश्वजीत आहेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे तज्ञ संचालक प्रा. प्रेमचंद मेने यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये 213 वधू वर व जवळपास 800 पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये चहा, नाश्ता व जेवणाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमास आर्यनंदी परिवाराचे सर्व सन्माननीय सदस्य आवर्जून उपस्थित होते.
सदर मेळावा व्यवस्थित पार पडण्यासाठी मेळावा सचिव व संस्थेचे संचालक श्री बाहुबली दुरूगकर, संचालक श्री निलेश एखंडे, तज्ञ संचालक प्रा. प्रेमचंद मेने, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वैभव आहेरकर, श्री प्रवीण बुर्से, श्री अनंतकुमार रणदिवे, श्री बसवराज परचंडे, श्री प्रकाश माशाळकर यांच्या चोख नियोजनामुळेच हा मेळावा अतिशय नेटकेपणा पार पडला.