आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्वादशकपूर्ती निमित्त कविसंमेलनाचे आयोजन

आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्वादशकपूर्ती निमित्त आयोजित केलेल्या कविसंमेलन मध्ये मान्यवर कवींचा सत्कार आर्यानंदि पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले सर , आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सहाय्यक संचालक मा. सुनिल शिनखेडे, पतसंस्थेचे संचालक श्री. बाहुबली दुरुगकर, श्री. प्रेमचंद मेने, डॉ. सौ. शिल्पा फडकुले, सौ. शांता येलांबकर ,यांनी मान्यवर कवींचे सत्कार केले. व तदनंतर  मान्यवर कवि डॉ. महेश केळुसकर, मा. शशिकांत तिरोडकर, मा. मधुसूदन नानिवडेकर ,मा. सौ.रुपाली कदम, मा. माधव पवार, मा. सौ.शोभना सागर मा. सुनील शिनखेडे यांनी आपल्या कविता सादर केल्या. कविसंमेलन नंतर  संस्थेचे संचालक डॉ. सुरेश व्यवहारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. अभिराम सराफ यांनी केले. काव्यसमेलनास संस्थेचे सर्व संचालक, सभासद , सल्लागार समिती सदस्य, सर्व कर्मचारी वर्ग व श्रोते मोठया संख्येने उपस्थित राहून कवितांचा मनमुराद आस्वाद घेतला. 29/12/2019

Posted On : 02-11-2020

Back to News

News