आमच्या आर्यनंदी पतसंस्थेची स्थापना हि, प.पू. १०८ आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या आशिर्वादाने दि. 29/06/1999 नोंदणी क्र. SUR /NSR/RSR/ (R)/ 455/99 नुसार अवघ्या पंधरा हजार रूपये भागभांडवलात संस्थेची सुरूवात झाली असून, आज तागायत संस्थेने 22 कोटी ठेवीचा पल्ला पार केला असून सदर आर्थिक वर्ष सन 2018-19 हे द्वादशकपूर्ती वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे.

संस्थेच्या यशामागे प.पू. गुरूदेवाचा आशीर्वाद आहे व तसेच याचं श्रेय सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांना जाते. त्यांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास म्हणून संस्थेस आदर्श पतसंस्था म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

 • इ.स. 2012 आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर यांच्या वतीने, सोलापूर जिल्ह्यातून “आदर्श पतसंस्था” म्हणून मा. जिल्हानिबंधक यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले.

 • सहकार खात्याच्या वतीने देण्यात येणारा “आदर्श पुरस्कार” सन 2013 मध्ये पतसंस्थेस मिळाला आहे.

पतसंस्था एवढ्यावरच थांबली नाही तर संस्थेने सामाजिक सेवेचे व्रत घेतलेले आहे. त्या समाज सेवेतून आजपर्यंत,

आर्यनंदी पुरस्कार वितरण : आर्यनंदी पतसंस्थेमार्फत आर्यनंदी पुरस्कार वितरण करण्यात येते त्यामध्ये खालील माननीयवरांना संस्थेमार्फत हा पुरस्कार देण्यात आला.

 • डॉ. पन्नालालजी पापडीवाल - आर्यनंदी मुनिभक्त पुरस्कार दि. 05/02/2011

 • श्री. श्रीकांत मोरे - आर्यनंदी साहित्यरत्न पुरस्कार दि.05/02/2011

 • श्री. जयकुमारजी क्षीरसागर - आर्यनंदी समाजरत्न पुरस्कार दि. 05/02/2011

 • डॉ. विजय धारूरकर – आर्यनंदी साहित्यसेवा पुरस्कार दि. 25/11/2012

 • शाहिर श्री. कुंतिनाथ करके – आर्यनंदी जीवनगौरव पुरस्कार दि. 25/11/2012

 • उद्योगपती श्री फुलचंद जैन – आर्यनंदी मुनिभक्त पुरस्कार दि. 25/11/2012

 • साहित्यिक सुमीरचंद जैन - आर्यनंदी जीवनगौरव पुरस्कार दि. 16/03/2014

 • डॉ. राजेंद्र दास - आर्यनंदी साहित्यसेवा पुरस्कार दि. 16/03/2014

 • दिपक महिंद्रकर - आर्यनंदी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दि.16/3/2014

 • डॉ. महावीर अक्कोळे - आर्यनंदी मुनिभक्त पुरस्कार दि. 16/03/2014

 • श्री. अभयकुमार पनवेलकर - आर्यनंदी समाजरत्न पुरस्कार दि. 02/05/2015

 • श्री. धन्यकुमार पटवा - आर्यनंदी जीवदया पुरस्कार दि. 02/05/2015

 • श्री. गुलाबराव इंदोरे - आर्यनंदी मुनिभक्त पुरस्कार दि. 02/05/2015

 • सौ. निलम मानगांवे - आर्यनंदी साहित्यसेवा पुरस्कार दि. 02/05/2015

 • श्री. गिरीष कुलकर्णी - आर्यनंदी समाजरत्न पुरस्कार दि. 02/05/2015


उपक्रम :

 • अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलन - सन 2005

 • बालकुमारसाहित्य संमेलन - सन 2006

 • दै. तरूण भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा - सन 2008

 • साहित्य जागर दिन - प्रतीवर्षी 21 नोव्हेंबर

 • जागतिक महिला दिन व महिला मेळावा - प्रतीवर्षी 8 मार्च

 • जागतिक ग्राहक दिन - प्रतीवर्षी 15 मार्च

 • अल्पसंख्याक मेळावा - प्रतीवर्षी

 • वधू वर परिचय मेळावा - प्रतीवर्षी

 • रांगोळी स्पर्धा - प्रतीवर्षी

 • आर्यनंदी सवंगडी बँक सन 2008 पासून आजतागायत सुरू

 • आरोग्य शिबिर - दि.04/08/2018

 • शालेय साहित्य वाटप - प्रतीवर्षी

 • गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - प्रतीवर्षी

 • व्याख्यानमाला - प्रतीवर्षी

 • पुरग्रस्तांना सहाय्य नैसर्गिक आपत्ती दरम्यान प्रत्येकवेळी (केरळ पुरग्रस्त निधी 31/8/2018)

 • पतसंस्था कर्मचारी प्रशिक्षण केंद्र - प्रतीवर्षी

 • वृक्षारोपण - प्रतीवर्षी

 • गरजु व निराधार ज्येष्ठ नागरिक यांना अन्नधान्य वितरण - प्रतीवर्षी

 • पाणपोई - प्रतीवर्षी माहे मार्च ते मे

 • विद्यार्थी दत्तक योजना - प्रतीवर्षी

असे विविध उपक्रम आजपर्यंत राबवित आहे.

संगणकीकृत : जागतिकीकरण खाजगी बँकांचे बँकिंग क्षेत्रात शिरकाव, शासनाची मुक्त अर्थव्यवस्था, तंत्रज्ञानातील उंच भरारी त्यामुळे गळचेपी स्पर्धा निर्माण झालेली आहे. स्पर्धात्मक गुणवत्ता टिकविण्याचे आव्हान संस्थेसमोर कालानुसार आलेले आहे. ते आव्हान निर्धारपुर्वक पेलून संस्थेची प्रगती आणि विकास व ग्राहकाचे हित व त्यांना नवनवीन सेवा पुरविण्यासाठी संस्था स्थापनेपासून सर्व व्यवहार संगणकीकृत केलेले आहे.

कॅशलेस व्यवहारास प्राधान्य : भारतीय आर्थिक घडामोडींमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले बदल यामुळे बँकेची व्याख्याच बदलून गेली व नवीन बँकिंग तत्रज्ञान युगास सुरूवात झाली. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य दिले. त्यामुळे आज बँकिंग क्षेत्राप्रमाणे पतसंस्थेसमोर कॅशलेस व्यवहार करण्याबाबतचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे संस्थेने नवीन तंत्रज्ञान , बँक सॉफ्टवेअरमध्ये झालेले नवीन बदल, ई- ट्रान्झेक्शन, ई- पेमेंट, मोबाईल बँकिंग, ई- बँकिंग इत्यादी अंगीकारले आहे.

मोबाईल बँकिंग : सभासदांना व ग्राहकांना घर बसल्या बँकिंग सुविधा, खातेशिल्लक, खातेउतार, फंड ट्रान्सफर इत्यादी सेवा देण्यासाठी आमची संस्था कटीबध्द आहे. म्हणून आम्ही चालू घडामोडींप्रमाणे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले असून बँकाप्रमाणेच आमच्या संस्थेच्या सभासद, ग्राहकांना घरबसल्या सेवा देत असून व्यवहार कॅशलेस करण्यासाठी मोबाईल बँकिंग ॲप चालू करुन NEFT/RTGS, डिश रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, फंड ट्रान्सफर इत्यादी सेवा देण्यात येत आहेत. तसेच संस्थेच्या व्यक्तिपासून समाजापर्यंत सामुहिक अर्थविकास घडविणे व त्याला दिशा, दृष्टी व संरचना देणे हा निर्धार आहे.

डिजीटल व ई सेवा : स्पर्धात्मक परिस्थितीचा विचार करून संस्थेने ग्राहकांना इतर सुविधांसोबतच त्यांनी केलेल्या सर्व व्यवहारांचे SMS सुविधा चालू केली असून संस्थेच्या ज्या खातेदारांनी आपला मोबाईल क्रमांक त्यांच्या खात्याला रजिस्टर केला आहे त्या मोबाईल क्रमांकावरून 9637224400 या क्रमांकाला मिस्ड कॉल दिल्यास त्यांना त्यांचा अकाऊंट बॅलन्स मोबाईलवर SMS द्वारे मिळेल. त्यामुळे त्यांना त्यांच्या खात्याचा बॅलन्स तात्काळ मिळेल. खातेदारांना भारतातून कोठूनही त्यांच्या संस्थेच्या खात्यावर रक्कम जमा करता येते व संस्थेतील त्यांच्या खात्यावरील रक्कम त्यांच्या कोणत्याही बँकेच्या वैयक्तिक खात्यावर किंवा खातेदारांच्या मागणीनुसार इतर खात्यावर NEFT/RTGS सेवा मात्र नाममात्र शुल्क घेऊन उपलब्ध करुन दिली आहे व त्यासाठी संस्थेने IFSC कोड घेतला असून तो कोड IFSC CODE- ICIC0000104 असा आहे. त्या सोबतच SMS बँकींग, मोबाईल बँकिंग ही सुविधा सुरू झाली असून लवकरच बँक आपल्या दारी ही सेवा ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करीत आहोत.

वेबसाईट : सध्याच्या डिजिटल युगात आमच्या प्रत्येक सभासदास व इतरांनाही संस्थेविषयीची माहिती घरबसल्या पाहता यावी व संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करता यावा संस्थेच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी संस्थेची स्वत:ची वेबसाईट आहे. (www.aryanandipariwar.com)

संस्थेने अर्थकाराणासह, सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातही ‍तन्मयतेने योगदान दिलेले आहे. म्हणूनच संस्थेला समाजातील विविध स्तरांतील घटकापर्यंत सेवा करण्याची संधी मिळाली. संस्थेने विविध उपक्रम शिबीरे स्पर्धा इत्यादी क्षेत्रातही प्रगती केलेली आहे.